फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
राजकारण

फेक नरेटिव्हचा गव्हाणेंचा आरोप

फेक नरेटिव्हचा गव्हाणेंचा आरोप

भोसरी : महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे पैसे सापडले आणि काही कार्यकर्त्यांना अटक केली, असा फेक नेरेटिव्ह पसरवला गेल्याचा आरोप, महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाविकास आघाडीला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांचा पराभव होताना दिसत आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक नागरिकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली असून गेल्या दहा वर्षातल्या दहशत, दडपशाहीला नागरिक चोख उत्तर देतील असे देखील अजित गव्हाणे म्हणाले.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, उमेदवार अजित गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते भरत लांडगे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"