दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर!

पुणे : पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केले आहेत.

राज्यातील सर्व विभागांमध्ये
पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर ,नाशिक, लातूर ,अमरावती ,संभाजीनगर आणि कोकण या तारखा लागू राहणार आहेत.
परीक्षा वेळापत्रक
बारावीची लेखी परीक्षा मंगळवार 17 फेब्रुवारी 2026 पासून ते 24 मार्च 2026 पर्यंत
दहावीची लेखी परीक्षा गुरुवार 26 फेब्रुवारी 2026 पासून ते 18 मार्च 2026 पर्यंत
बारावीचे मौखिक आणि प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2020 दरम्यान
दहावीचे मौखिक आणि प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान
प्रात्यक्षिक विषय
बारावी मध्ये माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान तर दहावी मध्ये शारीरिक शास्त्र ,आरोग्य शास्त्र आणि गृहशास्त्र या विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाईल.
विद्यार्थ्यांना सूचना
विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यासाची तयारी सुरू करावी. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम आणि वेळा पत्रकानुसार मार्गदर्शन करावे असे मंडळाने सांगितले आहे. राज्य मंडळाने सांगितले की लवकरच विषयवार सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, ही माहिती मंडळाचे सहाय्यक सचिव प्रमोद गाफणे यांनी दिली असून अधिसूचना 13 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

