फक्त मुद्द्याचं!

27th March 2026
गुन्हेगारी

दापोडी मेट्रो केबलची चोरी; आंतरराज्य टोळीचा प्रमुख अटकेत!

दापोडी मेट्रो केबलची चोरी; आंतरराज्य टोळीचा प्रमुख अटकेत!

 पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोची केबल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या प्रमुखाला पिंपरी चिंचवड पुणे शाखेच्या युनिट एकने उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे . दापोडी आणि कोथरूड येथे मेट्रोची केबल चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे .

avratra 8
avratra 8

दिलशाद श्याम शाद अन्सारी (वय 34 रा. खेकडा, बागपत, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दापोडी मेट्रो स्थानकाजवळ केबल वायर चोरीला गेल्या बाबत दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास केला असता एक व्यक्ती रात्रीच्या वेळी मेट्रो रेल्वे मार्गावर जाऊन तिथून तांब्याची वायर चोरी करत असल्याचे आढळले . संशयित व्यक्तीचा पाठलाग केला असता तो उत्तर प्रदेश मधील बागपत येथे असल्याचे आढळले . त्यानुसार त्याला उत्तर प्रदेश मध्ये अटक केली. त्याच्याकडून दापोडी मेट्रोस्थानक येथून चोरी केलेली दोन लाख रुपये किमतीची 300 मीटर तांब्याची वायर जप्त केली आहे .त्याने यापूर्वी कोथरूड मेट्रोस्थानकातून देखील तांब्याची वायर चोरी केली असल्याचे सांगितले .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"