पुणे – मुंबईत जिओ नेटवर्क डाऊन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : पुणे तसेच मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासून जिओचे नेटवर्क मिळण्यात ग्राहकांना अडचणी आल्या आहेत. सोशल मीडियावर लगेचच मीम्सचा पाऊस पडला आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यात सकाळी तर मुंबईत दुपारनंतर नेटवर्क उपलब्ध नसल्याचे ग्राहकांच्या लक्षात आले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या भागात जिओच्या ग्राहकांना रेंज मिळत नव्हती. अनेक कॉल ड्रॉप होत होते. क़ॉल कनेक्ट होण्यात अडचणी निर्माण झाल्या.
सध्या जिओच्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. जिओच्या नेटवर्कमध्ये गोंधळ निर्माण होताच, अनेकांनी समाज माध्यमांवरून एकमेकांशी संपर्क साधला. कॉल ड्रॉप, सुरू असलेल्या कॉलमधील शब्द ऐकू न येणे, अशा अनेक समस्या आज निर्माण झाल्या. बरेच ग्राहक या एकाच कंपनीवर अवलंबून असल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली.