फक्त मुद्द्याचं!

19th February 2026
गुन्हेगारी

गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांचा थेरगाव येथे मटका अड्यावर छापा!

गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांचा थेरगाव येथे मटका अड्यावर छापा!

19 जणांना पोलीसांनी घेतले ताब्यात
पिंपरी : पिंपरी चिंचवड चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी मटका अड्यावर छापा टाकून 19 जणांना ताब्यात घेतले आहे . 19 हजार 220 रुपये मटका जुगाराचे आकडे लिहिण्यासाठीच्या डायऱ्या, चिठ्ठ्या असे साहित्य जप्त केले. ही घटना बुधवार 18 फेब्रुवारी रोजी तीन वाजण्याच्या सुमारास न्यू अपना किराणा दुकानाचे बेसमेंट मध्ये वाकड येथे घडली. 19 जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

vcc 5
vcc 5

याबाबत अमर अजित राणे पोलीस शिपाई, गुन्हे शाखा युनिट दोन यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. कुमार सखाराम लोहार (वय 31, थेरगाव), अनंत साहेबराव चिता पल्ले (वय 52, बालेवाडी), नारायण हरिभाऊ जाधव (वय 51, रा. भोसरी), उदय अनंत मुळे (वय 62, पिंपरी), संतोष प्रल्हाद जगताप (वय 37, रा. चिंचवड स्टेशन), सचिन ज्ञानोबा काळे (वय 30, वेताळ नगर, चिंचवड), रामकिशन प्रल्हाद गायकवाड (वय 31, नखाते वस्ती, रहाटणी), दिनेश पितांबर कांबळे (वय 21, बौद्ध नगर पिंपरी), रामू सटवा धोत्रे (वय 34, कावेरी नगर पोलीस लाईन च्या मागे वाकड), सचिन मोहन शिंदे (वय 37, वाकड पोलीस स्टेशनच्या समोर), अभिषेक रमेश बंजकर (वय 20, डांगे चौक, थेरगाव), कल्पेश रामराव विकले (वय 28, थेरगाव फाटा ),सुरेश रामदास बराटे (वय 42 , श्रीनगर, राटणी), सोनू नवीन थोरात (वय 21, रमाबाई नगर, पिंपरी), समाधान शिवाजी पवार (वय 23, पवार नगर थेरगाव), अविनाश नरहरी वाबळे (वय 30, आदर्श कॉलनी, वाकड) अंकुश राजाराम अडसूळ (वय 42, बापूजीबुवा नगर, थेरगाव), नौशाद अबरार सय्यद (वय 26, पवार नगर, थेरगाव), शुभम दिलीप टांगसाडे (वय 26, पाटीलनगर, थेरगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे मटका जुगार खेळण्यासाठी संबंधित ठिकाणी आले होते. मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेण्यात आले . वाकड पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मारणे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"