फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पुणे

बेकायदेशीर गॅस रिफिलींग करणार्‍या तरूणावर गुन्हा!

बेकायदेशीर गॅस रिफिलींग करणार्‍या तरूणावर गुन्हा!

पिंपरी : बेकायदेशीरपणे गॅस रिफिलींग करणार्‍या तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मुळशी तालुक्यातील महाळुंगे पाडाळे येथे रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास करण्यात आली.

अविनाश दत्तात्रय माने (वय २५, रा. ग्रीन हील्स कॉलनी, महाळुंगे पाडळे, मूळ – गोंडगाव, ता. देवणी, जि. लातूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार विजय नलगे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी माने हा आर्य गॅस एजन्सी, गोदरेज हिलसाइड सोसायटीजवळ बेकायदेशीररित्या गॅस सिलिंडरमधून छोट्या टाक्यांमध्ये रिफिलींग करताना पोलिसांना आढळून आला. आरोपीकडून ४९ हजार १०० रुपयांचा अवैध गॅस साठा व साहित्य जप्त करण्यात आले आहे. महिला फौजदार जाधव तपास करीत आहेत.

viarasmall
viarasmall
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"