गोरक्षक युवराज गवळी यांनी राबवली “गोदान” मोहीम !

पुणे : गोरक्षक युवराज गवळी यांनी दि.२९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या चार दिवसात गोदान मोहीम राबवली. सध्या खेड्यातील वृद्ध मंडळी गायी पाळणे बंद करत आहेत, अशी परिस्थिती आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतीही चूक होऊ नये, म्हणून त्या गायींची सुरक्षा जपण्यासाठी गोरक्षक सतत प्रयत्नशील आहेत. आद्यगोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा अभियान नेहमी या गोरक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाते. गोदान मोहिमेमध्ये खडकी, मुळारोड, भोर, नांदेड सिटी या ४ ठिकाणाहून ताब्यात घेऊन तो जवळच्या गोशाळेत सोडण्यात आला. यावेळी या मोहिमेत ८ गोवंश वाचवून गोशाळेत पाठवण्यात आला अशी माहिती गोरक्षक संयोजक मिलिंद एकबोटे यानी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

वृंदावन गोशाळा ( कात्रज ), गोकुळधाम गोशाळा ( सारसबाग ), द्वारकाधीश गोशाळा ( हडपसर )आणि अहिल्यादेवी गोशाळा ( जांभूळवाडी ) या गोशाळांनी या ८ गोवंशाचे पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य दिले. ही जनावरे स्वीकारल्याबद्दल या सर्व गोशाळा चालकांचे अभिनंदन ! तसेच कत्तलीला जनावरे न देता गोशाळेला देणारे शेतकरी यांचे आद्यगोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा अभियान संयोजक मिलिंद एकबोटे यांनी अभिनंदन केले.
गोरक्षक युवराज गवळी, पंढरीनाथ शिंदे, उमेश कुलकर्णी, विजय कांबळी, राज गवळी, सागर मोहिते, महादेव मोठे, यश गवळी यांच्या प्रयत्नामुळे सदर गोवंशांचे कत्तलीपासून प्राण वाचले त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!