फक्त मुद्द्याचं!

29th March 2026
गुन्हेगारी

बांधकाम व्यावसायिकाकडून साडेपाच लाख रुपयांची फसवणूक!

बांधकाम व्यावसायिकाकडून साडेपाच लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी :  बांधकाम व्यावसायिकाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) अंतर्गत लोन मंजूर करण्याचे व सबसिडी मिळवून देण्याचे आमीष दाखवून लोन मंजूर करण्यासाठी 5 लाख 46 हजार पाचशे रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना 2023 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान योगीराज असोसिएट पुणे नाशिक हायवे रोड, भोसरी येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी शांताराम मारुती शिर्के (वय 54, रा एरंडवना गावठाण, फ्लॅट नंबर ३४ ,कर्वे रोड ,पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोमनाथ पठारे (वय 40 ),शुभम पाटील (वय 30, दोघेही राहणार भोसरी )असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगीराज असोसिएट पुणे नाशिक हायवे रोड ,भोसरी येथे आरोपी नंबर एक व दोन यांनी फिर्यादीस मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) अंतर्गत लोन मंजूर करणेसाठी व त्यामध्ये सबसिडी मिळवून देण्याचे आमीष दाखवून तसेच लोन मंजूर करण्यासाठी बँकेच्या अधिकारी व जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी यांना पैसे द्यावे लागतात  असे सांगून फिर्यादी यांच्याकडून स्वतःच्या फायद्यासाठी वेळोवेळी 5 लाख 46 हजार पाचशे रुपये बँकेचे खात्यातून व रोख स्वरूपात घेऊन फसवणूक केली. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत. 

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"