कसबा पेठेत पहिल्या टप्प्यात सर्वाधिक ७.४४ टक्के

जाणून घ्या..असं आहे पुणे जिल्ह्यातलं पहिल्या टप्प्यातलं मतदान
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : पुण्यातल्या जागरूक मतदारांनी पहिल्या टप्प्यातच मतदानाचा उत्साह दाखवला आहे. सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर दोन सातात म्हणजे नऊ वाजेपर्यंत सहा टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हाऊसिंग सोसायटी फेडरेशन आणि गृहनिर्माण संघटनांच्या सहकार्याने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये १०० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
शाळा, कॉलेज येथील मतदान केंद्रांबरोबरच यंदा पिंपरी-चिंचवडमधील सोसायट्यांमध्ये उभारलेल्या मतदान केंद्रांवरही नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदार संघांमध्ये सरासरी साधारण सहा टक्के मतदान सकाळच्या पहिल्या टप्प्यात झाले आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पीसीएमसीने जनजागृती मोहिम सुरू केली आहे आणि ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या (Know Your Polling Station)’ ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेमुळे नागरिकांना हेल्पलाइन क्रमांक (८८८८००६६६६) वरून त्यांचे मतदान केंद्र शोधता येईल.
मतदानाची टक्केवारी
२१५ – कसबा पेठ – ७.४४
२१४ – पुणे कॅन्टोन्मेंट – ५.५३
२१३ – हडपसर – ४.४५
२१२ पर्वती – ६.३०
२११ – खडकवासला – ५.४४
२१० – कोथरूड – ६.५०
२०९ – शिवाजीनगर – ५.२९
२०८ – वडगाव शेरी – ६.३७
२०७ – भोसरी – ६.२१
२०६ – पिंपरी – ४.०४
२०५ – चिंचवड – ६.८०
२०४ – मावळ – ६.०७
२०३ – भोर – ४.५०
२०२ – पुरंदर – ४.२८
२०१ – बारामती – ६.२०
२००- इंदापूर – ५.०५
१९९ – दौंड – ५.८१
१९८ – शिरूर ४.२७
१९७ – खेड आळंदी – ४.७१
१९६ – जुन्नर – ५.२९