पाकिस्तानच्या गोळीबारात आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू!

जम्मू : पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामध्ये अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला असल्याचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले आहे .मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे .राजौरी येथून आलेली ही माहिती धक्कादायक आहे. जम्मू काश्मीर प्रशासन सेवेतील एक समर्पित अधिकारी प्रशासनाने या गोळीबारात गमावला आहे.
कालच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बरोबर ते पाहणी करत फिरत होते ,शिवाय आमच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीला ते उपस्थित होते. पाकिस्तानने राजौरी शहराला लक्ष करत केलेल्या गोळीबारात या अधिकाऱ्याच्या निवासस्थानावर हल्ला झाला. ज्यामध्ये अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला. राजकुमार थापा यांनी जिल्ह्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. दुर्दैवाने दहा मे रोजी त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात एक तोप गळा लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे दोन कर्मचारीही गंभीर जखमी झाली आहेत .या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून पाकिस्तानने सीमा वरती भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू ठेवला आहे.

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्ररांनी हल्ला केला. पाकिस्तानने गुजरात, जम्मू आणि काश्मीर ,राजस्थान आणि पंजाब या चार राज्यांमध्ये 26 शहरांवर ड्रोन हल्ले केले .श्रीनगर विमानतळावरही हल्ला झाला. उत्तरेत जम्मू मधील बारामुल्ला ते पश्चिमेस गुजरात ,भुज दरम्यान 26 शहरांना लक्ष करण्यात आले .नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले करत पाकिस्तानने भारतीय लष्कराला डिवसण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र काही वेळातच भारतीय लष्कराने पाकला जशास तसे उत्तर दिले .पाकिस्तान मधील महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे .