अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे करणार वसूल!

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत आहेत. एकट्या पुण्यातून जवळपास 75 हजार महिलानी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे पैसे परत घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून हेड तयार करण्यात आलाय. आता ज्या अपात्र महिला लाभार्थी आहेत त्यांचे पैसे परत घेण्यासाठी हेड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी वाहन आहे किंवा इतर योजनांचा लाभ घेतला आहे, अपात्र असतानाही लाभ घेतल्याने कारवाई होऊ शकते, या भीतीने अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत आहेत.
अपात्र लाडक्या बहिणींमध्ये कोणाचा समावेश?
ज्या नियमात बसत नाहीत, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलंय. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण असलेल्या महिला लाडक्या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. अपात्र लाडक्या बहिणींना 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी देण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात आले आहे.
अपात्र ठरवण्यात आलेल्या लाडक्या बहिणी कोणत्या?
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – 2,30,000
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – 1,10,000
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००
एकुण अपात्र महिला – 5,00,000
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत असून पुण्यातुन जवळपास ७५ हजार महिला पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरूआहे .हे पैसे परत घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून हेड तयार करण्यातआले आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी वाहन आहे किंवा इतर योजनांचा लाभ घेतला आहे अशा अपात्र अनेक महिलांनी पैसे परत कराण्यास सुरुवात केली आहे. अपात्र असताना ही लाभ घेतल्याने कारवाई होऊ शकते या भितीने अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत आहेत.