फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

पोरबंदर येथे तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू

पोरबंदर येथे तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू

पोरबंदर : गुजरातमधील पोरबंदर तटरक्षक दलाच्या विमानतळावर मोठा अपघात झाला आहे. या ठिकाणी नौदलाचे एक हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमीही झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोरबंदरमधील तटरक्षक दलाच्या एअर एन्क्लेव्हमध्ये हे हेलिकॉप्टर उड्डाण करत होते. उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर कोसळले. उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह आणखी तीन जण होते. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"