उत्तरकाशी मधील धराली भागात ढगफुटी!

ढगफुटीत चार जणांचा मृत्यू, 50 जण बेपत्ता
उत्तराखंड : उत्तराखंड मधील खीर गंगा आणि धराली परिसरात ढगफुटी झाली आहे .या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून पन्नास जण बेपत्ता आहेत .खीरगंगा येथील बाजारपेठेतील अनेक स्टॉल्स ,काही तात्पुरती बांधकाम बांधकामे पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य . सुरू असून लष्कर ,एनडीआरएफ आणि एचडीआरएफ चे जवान घटनास्थळी बचाव कार्यात मदत करीतआहेत .महाराष्ट्रातील काही पर्यटकही या ढगफुटीत अडकल्याची माहिती मिळाली आहे.

उत्तरकाशी मधील धराली भागात झालेल्या ढगफुटीमुळे अचानक नदीला पूर आला यामुळे नदीकाठी असलेली काही हॉटेल्स , दुकाने आणि काही घरे वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. येथील मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ढगफुटी मुळे अचानक पूर आल्याने भू स्खलन झाल्याची घटना घडली आहे. आज दुपारी पावणेदोनच्या सुमाराला धरालीमध्ये ढगफुटी झाली .पुढील 24 तासासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळे मोठी आपत्ती ओढवली असून बचाव आणि मदत कार्य वेगाने केले जात आहे.