फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
गुन्हेगारी

दोन गटात हाणामारी; परस्‍पर विरोधी गुन्‍हा दाखल

दोन गटात हाणामारी; परस्‍पर विरोधी गुन्‍हा दाखल

पिंपरी : अपघातात वाहनाचे झालेले नुकसान भरून द्यावे, या मागणीसाठी दोन गटात हाणामारी झाली. ही घटना रविवारी मध्‍यरात्री दीड वाजताच्‍या सुमारास काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी दोन्‍ही गटातील दहा जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

अक्षय दिलीप भोसले (वय २८, रा. पवारनगर, काळेवाडी) यांनी सोमवारी (दि. २३) काळेवाडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी धीरज धर्मराज यादव (वय २७) अक्षय विकी मंदान (वय २७), अशप्रीतसींग हरपालसींग सींग शहाणी (वय २४, सर्व रा. काळेवाडी) हरिष वाशु भाटिया (वय २४), आणि हॅपी सुरेंद्रसींग संदु (वय ३१, दोघेही रा. पिंपरी) अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे आहेत. तर त्‍यांचे साथीदार मिंन्ट्या आणि रमिज (पूर्ण नाव, पत्‍ता माहिती नाही) यांच्‍या विरोधातही गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय भोसले यांच्‍यात दुचाकीचा अपघातात झाला. यामध्‍ये अक्षय यांच्‍या दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले. हे नुकसान भरून द्यावे, अशी मागणी फिर्यादी अक्षय भोसले यांनी आरोपींकडे केली. याचा राग मनात धरून आरोपींनी आपसात संगनमत करून आपल्‍या साथीदारांना बोलावून फिर्यादी, फिर्यादीचा भाऊ अनुप, मित्र प्रणव यांना लाकडी बांबू, प्‍लॅस्‍टिक बादली, प्लॅस्टीक झाकणाने, तसेच लाथा-बुक्क्याने मारहाण केली.

तर परस्‍पर विरोधी गुन्‍ह्यामध्‍ये हरिष वाशु भाटिया (वय २४) यांनी फिर्याद दिली आहे. अनुप दिलीप भोसले (वय २५), अक्षय भोसले, प्रणव गवळी या।च्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला असून पोलिसांनी अनुप भोसले याला अटक केली आहे. अपघातात दुचाकीच्‍या इंडिकेटचे नुकसान भरपाई न दिल्याचा राग येवुन आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी व त्‍यांचे मित्र यांना लाकडी बांबुने मारहाण केली. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"