छाया कदमने पीआयएफएफमध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार!

पुणे : पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये अभिनेत्री छाया कदम हिला अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा खास पुरस्कार प्राप्त झाला आहे. छाया कदमच्या स्नो फ्लॉवर या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.
काही दिवसांपासून सुरू असलेल्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये वैविध्यपूर्ण चित्रपटाचं स्क्रिनिंग, कलाकार-दिग्दर्शक यांच्या चर्चा होताना सगळ्यांनी पाहिल्या आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये हा खास पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात छाया कदमला स्नो फ्लॉवर साठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा खास पुरस्कार प्राप्त झाला आहे.
छाया कदमच्या पुरस्कारांचा हा सिलसिला असाच सुरू असून येणाऱ्या काळात छाया अनेक प्रोजेक्ट्सचा महत्त्वपूर्ण भाग असणार आहे.यावर्षी छायाचा लपता लेडीज हा चित्रपट ऑस्करसाठी भारतातंतून पाठवण्यात आला होता. तसेच मागीलवर्षी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर तिच्या ऑल वी इमॅजिन एस ए लाईट या चित्रपटाचेही कौतुक करण्यात आले.तिच्या कामाची पोचपावती म्हणून हा अजून एक महत्त्वपूर्ण पुरस्कार तिने पटकावला आहे.