फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
पुणे

जैन बोर्डींग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मदाय आयुक्ताकडून स्थगिती!

जैन बोर्डींग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मदाय आयुक्ताकडून स्थगिती!

पुणे : शिवाजीनगर मॉडेल कॉलनी मधील ऐतिहासिक जैन बोर्डिंग हाऊस च्या जागा विक्री विरोधात उभे राहिलेल्या लढ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे .मुंबई येथे धर्मादाय आयुक्तालयात आज सोमवार दिनांक 20 रोजी या प्रकरणाची तातडीची सुनावणी पार पडली .धर्मदाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला आहे. यामुळे जैन समाजाच्या संघर्षाला न्यायालयाने पाठबळ दिले आहे.

vishnoi divali 2
vishnoi divali 2

हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंग च्या जमीन विक्री विरोधात आज याची केवळ सुनावणी झाली. याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. योगेश पांडे यांनी भक्कम कायदेशीर आणि पुराव्यासहित मांडणी केली .जैन समाजाचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया ,अक्षय जैन आणि इतर अनेक बांधव देखील सुनावणीसाठी मुंबईत उपस्थित होते .समाजाचे लक्ष लागलेल्या सुनावणीत न्यायालयाने स्टेटसको आदेश दिला आहे. मॉडेल कॉलनी मधील जैन बोर्डिंग 1958 मध्ये हिराचंद नेमचंद दोशी यांनी उभारणी केली. यामध्ये दिगंबर जैन बोर्डिंग आणि श्वेतांबर जैन बोर्डिंग आहे .सध्याचे विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छुक होते .तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला.

काही दिवसापूर्वी ही जागा परस्पर गोखले कंट्रक्शन यांना विक्री करण्यात आली असा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मदाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम ,कायद्याची ,पायमल्ली केली .जमीन विक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कंट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागेबांधे असल्याचा आरोपही करण्यात येत आहे .या जैन बोर्डिंग मध्ये गेल्या 65 ते 67 वर्षात दहा हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. गरीब विद्यार्थ्यांना या बोर्डिंगचा विशेष लाभ झाला. जैन बोर्डिंग मध्ये 110 खोल्या आहेत. त्या चांगले अवस्थेत असताना येथील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले असा आरोप समाजाच्या वतीने करण्यात आला आहे .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"