फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
गुन्हेगारी

चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक

चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : प्रसिद्ध किर्तनकार आणि सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असणारे रील्स स्टार चैतन्य सयाजी वाडेकर (महाराज) यांना पिंपरी – चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

चैतन्य महाराज यांनी त्यांच्या इतर दोन भावांसह आणि इतर साथीदारांसह घराच्या जवळ असणारा रस्ता जेसीबीने बेकायदेशीरपणे खोदल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.

चैतन्य वाडेकर हे चाकण एमआयडीसीच्या हद्दीत राहतात. त्यांनी तीन भाऊ आणि साथीदारांच्या मदीतीने खासही रस्त्यासह कंपाउंड उखडले आहे. येथील एका बिल्डरबरोबर वाडेकर कुटुंबियांचे जमिनीवरून वाद सुरू आहेत. बिल्डरने त्यांच्या घरालगतची जागा विकसित केली असून तिथे कंपनी उभारण्यात आली आहे. मात्र, ती जागा आपलीच असून बिल्डरने ती हडपल्याचा आणि तिथं कंपाऊंड घातल्याचा आरोप वाडेकर कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याबाबतची कायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच वाडेकरांच्या बाजूने निकाल लागला आणि सरकारी मोजणीला मान्यता मिळाली.

जमीन वाडेकरांच्या मालकी आहे, हे सिद्ध होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असतानाच चैतन्य महाराजांनी तीन भाऊ आणि साथीदारांच्या मदतीने एका रात्रीत रस्ता उखडून टाकला आणि कंपाउंड काढून टाकले. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच हळूहळू त्यांनी आपली चूक मान्य केली.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"