पुणे रेल्वे स्थानकावर 51 लाख रुपयांची रोकड जप्त!

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर बॅग स्कॅनर मध्ये तपासणी करताना एका प्रवाशाकडे तब्बल 51 लाख रुपयांची रोकड सापडली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे . रोकड जप्त केल्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी आयकर विभागाकडे देण्यात आले आहे.

संबंधित तरुण हा गुजरात राज्यातील असून त्याच्या दोन बॅगेमध्ये पैसे भरलेले होते. रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून ही रोकड जप्त करून आयकर विभागाला याची माहिती देण्यात आली आहे फरीद खान जफर उल्लाखान मोगल ( वय 24 राहणार मेहसाणा गुजरात) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे .आरपीएफ ने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी 20 सप्टेंबर अम्ब्रेला गेट समोरील सरकता जिना चढून पादचारी पुलावर बॅगेज स्कॅनर मशीन द्वारे प्रवाशांच्या सामानाची तपासणी सुरू होती.
यावेळी फरीद खान याच्या जांभळ्या रंगाच्या बॅगेत सुमारे 22 लाख रुपये तर लाल रंगाच्या बॅगेत सुमारे 29 लाख रुपये आढळले . आरपीएफ निरीक्षक सुनील कुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली एएसआय प्रदीप चौधरी ,एएसआय संतोष जायभाये , एएसआय विलास दराडे संतोष पवार कृष्णा भांगे यांनीही कारवाई केली. रोकड जप्त केल्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी आयकर विभागाकडे देण्यात आले आहे

