फक्त मुद्द्याचं!

29th March 2026
गुन्हेगारी

तीस हजारांची लाच घेणाऱ्या रावेत पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांवर गुन्हा!

तीस हजारांची लाच घेणाऱ्या रावेत पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांवर गुन्हा!

आरोपीला अटक न करण्यासाठी

पिंपरी: आरोपीला अटक न करण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या रावेत पोलिस ठाण्यातील दोघांना शुक्रवारी (दि १८ जुलै ) रंगेहात पकडले आहे. हवालदार राजश्री रवी घोडे, सहायक पोलीस फौजदार राकेश शांताराम पालांडे यांना ताब्यात घेतले आहे असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्या आशिलावर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. प्रकरणाचा तपास हवालदार राजश्री घोडे यांच्याकडे आहे. संबंधित गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी, त्याच्याविरुद्ध दाखल होणा-या दोषारोपपत्रात आरोपीस फायदा होईल, अशा त्रुटी ठेवून दोषारोपपत्र पाठवण्यासाठी घोडे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयाची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने याबाबतची माहिती गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिली.

vaiga vcc
vaiga vcc

त्यानंतर तक्रारीनुसार पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली. घोडे यांनी मदत करण्यासाठी सुरुवातीस ५० हजार लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ३० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. तसेच सहायक पोलीस फौजदार पालांडे यांनी घोडे यांच्या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. लाच मागणीची पडताळणीची केल्यानंतर शुक्रवारी सापळा रचण्यात आला. रावेत पोलीस स्टेशनमध्येच तक्रारदाराकडून ३० हजारांची लाच घेताना पंचासमक्ष रंगेहात पकडले. त्यानंतर पालांडे यांना राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांविरुद्ध रावेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

 

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"