फक्त मुद्द्याचं!

26th February 2026
गुन्हेगारी

25 लाख रुपयांची फसवणूक केल्याने वडिलांविरोधात केला गुन्हा दाखल!

25 लाख रुपयांची फसवणूक केल्याने वडिलांविरोधात केला गुन्हा दाखल!

पिंपरी :नवीन व्यवसाय टाकून देतो, नवीन पतसंस्था टाकणार आहे त्यामध्ये सभासद करून घेतो, त्याचबरोबर एक गुंठ्याचा प्लॉट घेऊन देतो असे सांगून वडिलांनी मुलीची 23 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत महात्मा फुले नगर चिंचवड येथे घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत एका 34 वर्ष महिलेने (रा. फ्लॅट नंबर आठ, बिल्डींग नंबर एक, अमन सोसायटी, आकुर्डी चिखली रोड, महात्मा फुले नगर ,सेक्टर नंबर 18, चिंचवड) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलीप राधाकिशन अवताडे व शुभम दिलीप अवताडे (दोघेही रा. निर्मलनगर, न्यू आर्ट्स कॉलेज जवळ, शेवगाव, ता. शेवगाव जि. अहिल्यानगर )अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला व तिचा पती स्वप्नील श्रीधर पोटे यांनी आपले सासरे आरोपी क्रमांक एक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये फिर्यादीचे वडील दिलीप राधाकिशन अवताडे यांनी फिर्यादी व त्यांचे पती श्रीधर पोटे यांचा विश्वास संपादन करून 23 लाख रुपये घेतले. त्यावेळी नवीन पतसंस्था टाकणार आहे त्यामध्ये सभासद करून घेतो, नवीन व्यवसाय टाकून देतो, तसेच 25 लाख भरल्यानंतर एक गुंठ्याचा प्लॉट घेऊन देतो असे आमीष दाखवले .

आरोपी क्रमांक एक यांना 23 लाख तर आरोपी क्रमांक दोन यांना दोन लाख रुपये फिर्यादीने दिले आहेत . त्यांनी कोणतेही आश्वासन पाळले नाही. शिवाय रक्कमही परत दिली नसून फिर्यादीची फसवणूक केली आहे. चिखली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोमारे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"