बंद फ्लॅटमध्ये पत्ते जुगार;सात व्यक्तींना अटक!

पिंपरी: बंद फ्लॅटमध्ये तीन पाणी पत्ते जुगार खेळत असताना सात व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख 86 हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना रविवार 4 जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पवना नदी पात्रालगत पिंपळे सौदागर येथे घडली.
याबाबत शैलेश मधुकर काळभोर पोलीस हवालदार, सांगवी पोलीस स्टेशन यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मनोज सिताराम मारतोडे (वय 56), धनाजी सौदागर कोल्हे (वय 45), कपिल बाबुलाल चक्रनारायण (वय 30), दत्तात्रय अच्युतराव शिंदे (वय 45) भारत गोपाळ राऊत (वय 34), संतोष विठ्ठल देवकाते (वय 49), राजेंद्र काशिनाथ थोरात (वय 53) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एक ते सात हे बंद फ्लॅटमध्ये तीन पाणी पत्ते जुगार पैसे लावून खेळत असताना त्यांच्याकडून एकूण 186200 रुपये किंमतीचा रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगताप करत आहेत.

निवडणुकीच्या धामधुमीत दारूची तस्करी
पिंपरी: महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मोशी परिसरात एका आलिशान मर्सिडीज कार मधून बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहतूक व्यावसायिकावर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई रविवार चार जानेवारी रोजी दुपारी बोराडे वाडी येथे करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई संदीप अश्रूबा सौदागर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सागर सुभाष बोराटे (वय 38, बोराडेवाडी, मोशी) या आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आपल्या मर्सिडीज बेंज कार मधून विनापरवाना दारू घेऊन जात होता. पोलिसांनी 4170 रुपये किमतीची दारू व 50 हजार रुपये रोख आणि 26 लाख रुपये किमतीची मर्सिडीज कार असा मुद्देमाल जप्त केला आहे .एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत दारूची तस्करी

