Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

विक्रीकरिता आणलेला 73 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त ;एकास अटक

विक्रीकरिता आणलेला 73 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त ;एकास अटक

पिंपरी : अवैधरित्या 73 हजार 400 रुपये किंमतीचा अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्याने दोन व्यक्ती विरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवार आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास मोरया हाऊसिंग सोसायटी गेटच्या समोर, बिजलीनगर रोड, वेताळ नगर, चिंचवड येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी प्रतीक संभाजी कवडे पोलीस शिपाई अंमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी फिर्याद दाखल केली आहे. यश सचिन गवळी (वय 19, बिल्डिंग नंबर 9, पाचवा मजला, घर नंबर 507, वेताळ नगर ,चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून महाराज सोनारी तुळजापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गवळी याने त्याच्या ताब्यात एकूण 73 हजार 400 रुपये किंमतीचा १४५४ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा हा बेकायदेशीर रित्या विक्रीकरिता जवळ बाळगला. त्याच्याकडून एक वजन काटा, रिकाम्या प्लास्टिक पिशव्या, काळ्या रंगाची बॅग सह गांजा जप्त करण्यात आला. आरोपीने हा गांजा कुठून व कोणाकडून आणला याबाबत चौकशी केली असता सदर गांजा हा महाराज सोनारी तुळजापूर यांच्याकडून विक्रीकरिता आणल्याचे सांगितले. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बळीप व पोलीस उपनिरीक्षक दुधे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"