फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
देश विदेश

कॅनडा सरकारने लॉरेन्स विष्णोई गॅंगला केले दहशतवादी संघटना घोषित!

कॅनडा सरकारने लॉरेन्स विष्णोई गॅंगला केले दहशतवादी संघटना घोषित!

भारत सरकारने या निर्णयाचे केले स्वागत
मुंबई:कॅनडा सरकारने लॉरेन्स विष्णू ई गॅंगला दहशतवादी संघटना म्हणून अधिकृतपणे घोषित केल्याने लॅारे्न्स विष्णोई गँगच्या संपत्तीवर कारवाई करण्यास कॅनडा पोलिसांना आता जादा अधिकार मिळाले आहेत.लॉरेन्स विष्णोई गॅंग ही एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असून त्यांचे मुख्य काम भारतातून चालत आहे.

avratra 8
avratra 8

कॅनडात ही गॅंग सक्रिय आहे. यांच्या सदस्यांनी विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला आहे.ज्यात हत्या,गोळीबार,खंडणी,वसुली आणि धमकी यांचा समावेश आहे.कॅनडामध्ये शिख समुदायांशी संबंधित व्यक्तींना या गँगने लक्ष केले आहे 2023 मध्ये ब्रिटिश कोलंबियांमध्ये शिख कार्यकर्ता हरदीप सिंग निज्जर याची हत्या करण्यात आली.या हत्यामागे विष्णोई गॅंगचा हात असल्याचा आरोप करण्यात आला.कॅनडा सरकारने संपत्तीवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यांच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अधिक अधिकार मिळाले आहेत.कॅनडा सरकारने विष्णोई गॅंगला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केल्याने भारत सरकारने या निर्णयाचे स्वागत केले आहे.या गॅंग सदस्यांना भारतात आणण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.कॅनडाने या गॅंगच्या सदस्यांविरुद्ध कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे.

सिद्धू मूसेवाला या पंजाबी गायकाची 2022 मध्ये हत्या करण्यात आली.ही हत्या लॉरेन्स विष्णोई आणि त्याचा साथीदार गोल्ड ब्रार यांनी केली होती,त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. 2021 मध्ये अकाली दल युवा नेते विकी मुडूखेरा याची हत्या करण्यात आली.मुसेवाला आणि मुडूखेरा यांचा संबंध असल्याचा दावा विष्णोई गँगने केला होता.सुखदूर सिंग गिल जो कॅनडियन खलिस्तान समर्थक म्हणून ओळखला जातो.त्याची 2023 मध्ये कॅनडात हत्या करण्यात आली,ही हत्या विष्णोई  गँगने केल्याची जबाबदारी स्वीकारली होती.कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक कार्यकर्त्यांवर विष्णोई गँगने हल्ले केले आहेत. विष्णोई गँग भारत,कॅनडा,जर्मनी,थायलंड आणि इतर देशांमध्ये सक्रिय आहे.ते ड्रग्ज तस्करी,शस्त्राश्त्र तस्करी आणि मनी लॉन्ड्री सारख्या गुन्ह्यांमध्ये सामील आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"