फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
देश विदेश

ओटीटीवरील अश्लील कार्यक्रमांवर आणा ताबा : सरसंघचालक भागवत

ओटीटीवरील अश्लील कार्यक्रमांवर आणा ताबा : सरसंघचालक भागवत

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत विजयादशमी उत्सवात यांनी हिंदू जागर केला. पाकिस्तान, बांगलादेशच नाही तर जगभरातील हिंदूंच्या हक्क रक्षणासाठी केंद्र सरकारने मदत करण्याचे आवाहन त्यांनी केलं. नागपूरमध्ये पार पडलेलया विजयादशमी उत्सवात त्यांनी अनेक मुद्यांवर सरकारचे कान धरले आहेत.

मोहन भागवत यांनी सरकार आणि हिंदूंना दुर्बलता हा अपराध असल्याचं थेट आवाहन केलं आज. अत्याचार सहन न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर त्याचवेळी सरसंघचालकांनी प्रामुख्याने ओटीटीच्या माध्यमातून पसरत असलेल्या अश्लिलतेवर त्यांनी प्रहार केला.

बांगलादेशामध्ये अशी चर्चा आहे. भारत आपला शत्रू आहे. पाकिस्तान आपला मित्र आहे. तिथे अशी चर्चा आहे. असे नॅरेशन होत आहे. बांगलादेशामध्ये जे घडलं तसं घडण्यासाठी भारतात होण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. संस्थांना कब्तात घ्यायचं, शिक्षण संस्था, विद्यापीठ, माध्यम या द्वारे समाजात विचारांची विकृती पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सरसंघचालकांनी केला आहे. आपल्या लोकांना आपणंच शिव्या देण्याचं वातावरण निर्माण केलं जातं आहे. लोकांना उग्र करुन, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न. यामुळे त्या देशावर बाहेरुन वर्चस्व करणं सोप होतं. कारण आता युद्ध करणं सोपं नाही, त्यामुळे हे केलं जात आहे. देशात अशांतता पसरवण्यासाठी बाहेरील शक्तीला देशात मदत मिळतेय. देशात लोकशाही पद्धतीत अनेक पक्ष आहे. पर्यायी राजकारणाच्या आड येऊन हा अजेंडा सुरु झाला आहे. भारताच्या सिमाभागात याबाबतचे कारस्थान सुरू आहे. त्यामुळे आपल्याला वेळेवर जागं व्हायचं आहे. एक राष्ट्रीय नॅरेटीव्ह चालवायला लागेल. अभियान चालवावं लागेल. समाजाला संरक्षित ठेवण्यासाठी याची गरज आहे.

काही लपून राहत नाही. मीडिया सर्वत्र पोहोचली आहे. मोबाईल घरा घरात पोहचला आहे. तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. जो नशा करत नाही. त्याला मागास समजलं जातंय. एका सिस्टम हरण झालंय रामायण झालंय. कोलकात्यामध्ये काय झालंय. तिथे डॅाक्टरांसोबत सर्व देश उभा राहीला. सर्वत्र असं होतंय. गुन्हे आणि राजकारणाचं मिलन झाल्याने असं होत असल्याचा आरोप सरसंघचालकांनी केला आहे.

विषमता येवढी वाढली की आपले संत आम्ही वाटले. वाल्मीत जयंती फक्त वाल्मीकी समाजातंच का व्हावी. सर्व समाजानं करावं. समाजात काय धोके आहे. याची माहिती आपल्या समाजात देणं गरजेचं आपल्या भागातील समाजाची एक समस्या आपण दूर करायला हवी. आपल्यात ज्या दुर्बल जाती आहे. त्यासाठी आपण काय करायचं , हे ठरवायला हवं. समाजामध्ये वेगवेगळ्या जातीमधील लोक एकत्र बसून काम करतात. तर समाजात सद्भावना राहिल, असं त्यांनी म्हटलंय. ओटीटीवर चालणाऱ्या अश्लाघ्य, अश्लिल कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याची गरज आहे. व्यवस्थित चालायचं असेल तर मिळून चालण्याचा शास्र आहे. संविधानाची प्रस्तावना, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्व,आणि अधिकार हा विचार समाजात पोहोचायला हवा. नेहमी सतर्क रहावं जेनेकरुन आचरण चांगलं राहिल, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"