फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
गुन्हेगारी

प्रेयसीवर प्रियकराने केले चॅापरणे वार!

प्रेयसीवर प्रियकराने केले चॅापरणे वार!

 पिंपरी : हिंजवडी येथे प्रेम प्रकरणातून एका 18 वर्षीय मुलीवर चॅापरणे हल्ला करण्यात आला. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी प्रियकर योगेश भालेराव ,प्रेम लक्ष्मण वाघमारे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 वर्षे तरुणी आणि आरोपी योगेश यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रेम संबंध होते. योगेश विवाहित होता आणि त्याच्या पत्नीला त्यांचे नाते कळाल्यानंतर ती त्याला सोडून गेली. लग्नाबाबत अठरा वर्षीय तरुणीकडे आरोपीने तगादा लावला होता .प्रेयसीचे अन्य तरुणाशी प्रेम संबंध असल्याचे समजल्यानंतर योगेश संतप्त झाला. हिंजवडीतील साखरे वस्ती येथे योगेशने दोन मित्रासह प्रेयसीवर चॅापरणे हल्ला केला. तिच्या हाताला तोंडाला आणि इतर भागात दुखापत झाली आहे. मुलीला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी ही माहिती दिली आहे

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"