बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शहा यांचे निधन!

मुंबई : जाने भी दो यारो ,मै हू ना सारख्या चित्रपटासह अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज निधन झाले. किडनीच्या आजारामुळे ते त्रस्त होते. वयाच्या 74 व्या वर्षी या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.

भारतीय चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे. चार दशकावून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले .आपल्या अफाट विनोदी बुद्धी आणि अनोख्या अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात सतीश शहा यांनी कायमचे स्थान मिळवले. 1983 मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रपट जाने भी दो यारो मधील त्यांच्या अनेक भूमिकांनी त्यांना घराघरात लोकप्रिय केले. त्यांच्या फिल्मोग्राफीमध्ये हम साथ साथ है ,मै हू ना ,कल हो ना हो ,कभी हा कभी ना ,दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे आणि ओम शांती ओम सारख्या अनेक हिट चित्रपटां चा समावेश आहे.
दूरदर्शनवरही सतीश शहा यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. साराभाई वर्सेस साराभाई मालिकेत त्यांनी साकारलेली इंद्र वदन साराभाई ही व्यक्तिरेखा आजही भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक संस्मरणीय कॉमिक रोल्स पैकी एक मानली जाते. सतीश शहा यांच्या जाण्याने भारतीय मनोरंजन विश्वाने आपल्या विनोद आणि संवेदनशीलतेचा एक अनमोल खजिना हरवला आहे. उद्या 26 ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती आहे.

