बंदूक साफ करताना गोविंदा जखमी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : स्वतःची बंदूक स्वच्छ करत असताना बॉलिवुड अभिनेता गोविंदा याच्या पायाला आज पहाटे गोळी लागली आहे. अनवधानाने ही गोळी त्याच्याच गुडघ्याला गोळी लागली आणि गोविंदा जखमी झाला.
आज (बुधवार) पहाटे ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा सध्या आयसीयूमध्ये दाखल आहे. त्याच्या जिवाला कोणताही धोका नाही आणि त्याची प्रकृती सुद्धा स्थिर आहे. रुग्णालयाकडून अद्याप अन्य सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. गोविंदावर लहानशी शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्याची माहिती आहे.
अनवधानाने, तरी कसं घडलं?
या घटनेसंदर्भात ANI ने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदाला १ ऑक्टोबर, मंगळवारी स्वत:च्याच बंदुकीतली गोळी लागली. या घटनेनंतर त्याला जवळ असलेल्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कोलकत्ता येथे एका कार्यक्रमाला जाण्याासाठी गोविंदा घरातून निघत होता. तेव्हा घरात स्वत:ची बंदुक साफ करत असताना चुकून स्ट्रीगर दाबला गेल्यानं घटना घडली. गोळी त्यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ लागली. त्यामुळं गोविंदा जखमी झाला. आता त्याची तब्येत स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
जबाब नोंद होणार
दरम्यान, अनावधानानं स्वतःकडील बंदुकीची गोळी लागली असली तरी, जुहू पोलिस या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. गोविंदाच्या कुटुंबियाचे तसंच कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच पोलिसांनी ती बंदूक देखील ताब्यात घेतली आहे.