निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पिंपरीत भाजपाची दहशत!

विरोधी उमेदवाराच्या घरात घुसून एका महिलेला शिवीगाळ
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पिंपरी गावात भाजप समर्थक कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवाराच्या घरात घुसून एका महिलेला शिवीगाळ करुन दहशत निर्माण केली अशी फिर्याद पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 21 मधील विरोधी उमेदवाराच्या घरात भाजप कार्यकर्ते शिरले असा आरोप केला जात आहे. तशी व्हिडिओ समोर आणून हे भाजपचे कार्यकर्ते आहेत असा दावा आहे.

आमच्या विरोधात निवडणूक रिंगणात उभे राहण्याची हिंमत का केली? अशी धमकी दिल्याचे ही फिर्यादीत म्हटले आहे. हे आरोपी भाजपच्या उमेदवार यांचे समर्थक आणि कार्यकर्ते असल्याचा त्यांचा आरोप आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास नवमहाराष्ट्र स्कूल पिंपरी गावातील घराजवळ घडली. स्वप्नील वाघेरे, सुरज वाघेरे ,सागर वाघेरे. वरूण जगताप, प्रशांत वाघिरे, सारंग वाघेरे इतर काही जणांनी घरासमोर येऊन स्वप्निल वाघेरे यांनी आमच्या परवानगीशिवाय घरात प्रवेश केला. माझे चुलत सासरे यांना अश्लील शिवीगाळ केली .
तुम्ही आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे धाडस केले तुम्हाला जिवे मारून टाकू अशी धमकी देण्यात आली असे फिर्यादीत म्हटले आहे. या कार्यकर्त्यांनी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. त्याचबरोबर दिराला धक्काबुक्की ,आजे सासू यांना ढकलून दिले, दुचाकी वाहनाचे नुकसान केले. दहशत निर्माण केली असे अनेक आरोप फिर्यादीत केले आहेत. या दहशत प्रकारामुळे पिंपरी मधील वातावरण अशांत झाले आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात दहशत निर्माण करून मतदारांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे समजते.

