महेश लांडगे १३व्या फेरीअखेर ३९,६१५ मतांनी आघाडीवर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : भोसरी विधानसभा मतदारसंघात १३ व्या फेरी अखेर महेश लांडगे ३९,६१५ मतांनी आघाडीवर आहेत.
चौथ्या फेरी अखेर महेश लांडगे यांना ३९,००० तर महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना २६,००० मते मिळाली होती. अगदी पहिल्या फेरीपासून लांडगे यांना आघाडी मिळाली असल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला आहे. या मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे, महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांच्या लढत आहे.
पहिल्या फेरीमध्ये लांडगे २,२०९ मतांनी आघाडीवर होते. महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांना ५,४८२ तर महेश लांडगे यांना ७,६९१ मते होती.
तिसऱ्या फेरीत महेश लांडगे ११ हजारांनी आघाडीवर गेले. चौथ्या फेरीत लांडगे पुन्हा १३ हजारांनी आघाडीवर होते. या फेरीत लांडगे यांना ३९,००० तर गव्हाणे यांना २६,०००
मते मिळाली. आणि भोसरी सहाव्या फेरीअखेर महेश लांडगे यांनी २०,००० मतांची आघाडी घेतली.