फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पुणे

पुणे शहरातील सहा मतदारसंघात भाजपा विजयी

पुणे शहरातील सहा मतदारसंघात भाजपा विजयी

पुणे: पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघापैकी भारतीय जनता पक्षाने आपल्या सहाही जागा कायम राखल्या असून राष्ट्रवादी अजित व शरद पवार गटाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला आहे. कसबा मतदारसंघ भाजपाने पुन्हा आपल्याकडे खेचुन आणला आहे.मतदारसंघ निहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
कसबा
हेमंत रासने (भाजपा)- विजयी
रवींद्र धंगेकर (काँगेस) – पराभूत
गणेश भोकरे, (मनसे )- पराभूत

पर्वती
माधुरी मिसाळ,(भाजपा )- विजयी
अश्विनी कदम, (राष्ट्रवादी -शरद पवार) – पराभूत

पुणे कॅन्टोन्मेंट
सुनील कांबळे, (भाजपा) – विजयी
रमेश बागवे, (काँगेस) – पराभूत

कोथरूड
चंद्रकांत पाटील (भाजपा) – विजयी
चंद्रकांत मोकाटे, (शिवसेना – ठाकरे) – पराभुत
किशोर शिंदे, (मनसे) – पराभूत

शिवाजीनगर
सिद्धार्थ शिरोळे, (भाजपा) – विजयी
दत्ता बहिरट, (काँग्रेस) – पराभूत

हडपसर
चेतन तुपे – (राष्ट्रवादी -अजित पवार) – विजयी
प्रशांत जगताप – (राष्ट्रवादी -शरद पवार) पराभूत
साईनाथ बाबर, (मनसे )- पराभूत

वडगाव शेरी
सुनील टिंगरे -(राष्ट्रवादी – अजिप पवार) – पराभुत
बापू पठारे- (राष्ट्रवादी -शरद पवार) – विजयी

पराभवानंतर वडगाव शेरीतील उमेदवार आक्रमक
ईव्हीएम यंत्रणेत घोळ असल्याचा आरोप वडगाव शेरी मतदार संघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादी यांनी केला. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून लवकरच जनहित याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याचे चलवादींनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"