फक्त मुद्द्याचं!

10th February 2026
महाराष्ट्र

जिल्हा परिषद निवडणुक भाजप अव्वल; पुणे जिल्हा परिषद पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे!

जिल्हा परिषद निवडणुक भाजप अव्वल; पुणे जिल्हा परिषद पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे!

मुंबई :राज्यातील बारा जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाला आहे.राज्यात भाजप 232 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 172, शिवसेना शिंदे 160, काँग्रेस 60 शिवसेना उबाटा 46, राष्ट्रवादी शरद पवार 21 आणि अन्य 33 असे एकूण 7 20 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) गटाने आपले वर्चस्व कायम राखल आहे. जिल्हा परिषदेतील 73 जागांपैकी 44 जागा जिंकून जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा आपले बहुमत कायम ठेवले आहे.

viara vcc
viara vcc

बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सात हजार 438 इतके उमेदवार रिंगणात होते. 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी शनिवार सात फेब्रुवारी रोजी मतदान झाले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे ,सातारा, सांगली, कोल्हापूर ,सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या बारा जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी जवळपास 299 तर 13 पंचायत समितीच्या 146 जणांसाठी 528 उमेदवार रिंगणात होते .

मावळमध्ये भाजपचा सुपडा साफ
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाचही गटांमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. दहा पैकी दहा ही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचा एकही सदस्य निवडून आला नाही. मावळमध्ये भाजपचा सुपडा साफ झाला आहे. त्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर तोफ डागली आहे. मावळच्या जनतेने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली असून जिल्हा परिषदेच्या पाचही गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि मावळ पंचायतीमधील सर्व गणातील उमेदवार विजयी झाले आहेत. हा विजय अजितदादांना समर्पित करतो असे शेळके म्हणाले.

राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकाचा तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकाने विजयी झाले आहेत. शिंदे यांची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्या खालोखाल काँग्रेस, शिवसेना उबाटा, राष्ट्रवादी शरद पवार आणि अन्य 30 पेक्षा जादा जागा मिळविल्या आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) गटाने आपले वर्चस्व कायम राखल आहे. जिल्हा परिषदेतील 73 जागांपैकी 44 जागा जिंकून जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा आपले बहुमत कायम ठेवले आहे .पुणेकरांनी दादांचे नेतृत्व मान्य करून त्यांना ही मोठी आदरांजली वाहिलेली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"