फक्त मुद्द्याचं!

10th February 2026
गुन्हेगारी

भाजप पदाधिकारी असलेल्या ठेकेदाराची उपायुक्तांना धमकी: ठेकेदारावर गुन्हा!

भाजप पदाधिकारी असलेल्या ठेकेदाराची उपायुक्तांना धमकी: ठेकेदारावर गुन्हा!

पिंपरी : शहर भाजपचा पदाधिकारी असलेल्या ठेकेदाराने त्यांच्या एजन्सीला ठेका मिळावा म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका उपायुक्त महिला अधिकाऱ्यास दमदाटी करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत महापालिका उपायुक्त ममता शिंदे यांनी पिंपरी येथील संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत ठेकेदार पोपट हजारे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर ठेका मिळवण्यासाठी दमदाटी करण्याचे प्रकार भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा दबावाला पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी बळी पडणार का? अशी चर्चा महापालिका वर्तुळात सध्या सुरू आहे. महापालिकेतील समाज विकास विभागातील कंत्राट पोपट हजारे यांच्या सनराईज फाउंडेशन एजन्सीला मिळावे यासाठी त्यांनी उपायुक्त ममता शिंदे यांच्या दालनात घुसून निविदा प्रक्रियेतील नियम बदलण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

त्यावर उपायुक्त शिंदे यांनी कंत्राटाबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला मात्र हजारे यांनी त्यांचे न ऐकता मी सांगतो, त्यामुळे तुम्ही नियम व अटी बदला मला काही माहीत नाही तुम्ही तसे केले नाही तर बघून घेईन अशी धमकी त्यांनी दिली. हा प्रकार महापौर उपमहापौर निवडीच्या दिवशी दुपारी दीडच्या सुमारास उपायुक्तांच्या दालनात घडला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"