फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंना मिळणार महसूल खातं?

एकनाथ शिंदेंना मिळणार महसूल खातं?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : इनका शाम को समझेगा.. लेकीन मै तो शपथ लेने वाला हूँ… एकनाथ शिंदेंना उद्देशून केलेल्या अजित पवारांच्या या हशा पिकवणाऱ्या वाक्यानंतर शिंदेंचा मंत्रिमंडळताली प्रवेशावर सस्पेन्स कायम राहिला होता. पण आज त्याचाही उलगडा झाला आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे सुद्धा शपथ घेतील, हे स्पष्ट झालं.

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दोनवेळा शिंदेंची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, तरी शिंदे आपल्या मागण्यांवर ठाम होते. शिंदे गृहमंत्रिपदासाठी आग्रही होते. तर, भाजपला गृहमंत्रिपद आपल्याकडे ठेवायचं होतं. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोठी घडत होत्या. वारंवार महायुतीच्या नेत्यांच्या बैठका होत होत्या. मात्र, शपथविधीच्या आदल्या दिवशीपर्यंतही यावर कुठला तोडगा निघालेला नव्हता. अखेर, शपथविधीला काही तास शिल्लक असताना शिंदे शपथ ग्रहण करण्यासाठी तयार झाले.

वारंवार झालेल्या चर्चांनंतरही तोडगा निघत नसल्याचे लक्षात आल्यानंतर, तुमच्या मागण्यांबाबत भाजपकडून विचार केला जाईल, तसेच, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून तुम्हाला कळवण्यात येईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं होतं. इतकंच नाही तर, शिवसेनेला गृहमंत्रिपदाच्या मोबदल्यात भाजपकडून महसूल खातं देण्यात येईल, असंही संकेत फडणवीसांनी दिल्याची माहिती आहे.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?
या बैठकीत फडणवीस शिंदेंना म्हणाले की, तुम्ही मुख्यमंत्री असताना मी उपमुख्यमंत्री झालो. आपण एकत्र निवडणुकीला सामोरे गेलो. अडीच वर्ष एकत्र काम केलं. तुमच्या मागण्यांची दखल घेतली आहे. त्यावर वरिष्ठांसोबत बोलून तोडगा काढण्यात येईल. तुमच्या मागण्यांवर चर्चा केली जात आहे. तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे तुम्हीही सरकारमध्ये सामील व्हावं, अशी इच्छा आहे. जर, फक्त मी आणि अजित पवारांनी शपथ घेतली, तर ते योग्य दिसणार नाही. त्यामुळे तुम्हीही शपथ ग्रहण करावी, अशी विनंती फडणवीसांनी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची तयारी दर्शवली.शिंदे हे गृहखातं मिळावं या मागणीवर ठाम होते. तर, भाजपलाही गृहखातं सोडायचं नव्हतं. त्यामुळे भाजपने शिंदेंना नवी ऑफर देत महसूल खातं शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महसूल खात्यावर एकनाथ शिंदेंही तयार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे याबाबत सध्या भाजप-शिवसेनेत सकारात्मक चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"