फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
महाराष्ट्र

भाजपच्या चौघांकडे प्रचाराचे नेतृत्व

भाजपच्या चौघांकडे प्रचाराचे नेतृत्व


मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता विधानसभेसाठी रणनीती आखण्यासाठी सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जम्बो टीम तयार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या गडकरींकडे विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी दिली असून निवडणूक व्यवस्थापन समितीचे संयोजक प्रमुखपदी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची निवड करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर भाजपाने विधानसभेसाठी चार जणांकडे प्रचाराचे नेतृत्त्व दिले आहे. नितीन गडकरींकडे विशेष प्रचारकपद देण्यात आले आहे. ते महिनाभर राज्य पालथे घालतील. विविध भागांत जाऊन पक्षाचा प्रचार करतील. निवडणूक व्यवस्थापन समितीचे संयोजक प्रमुखपदी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची निवड करण्यात आली आहे. या दोघांशिवाय प्रचाराचे नेतृत्त्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे असेल.

स्टार प्रचारकांमध्ये रथी-महारथी
भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. त्यात १७ जणांचा समावेश आहे. यातील काही जण काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीत खासदार अशोक चव्हाण, खासदार नारायण राणे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन महाजन, रविंद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रविण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे.

विदर्भातील ६२ जागांवर विशेष लक्ष
प्रचाराचे नेतृत्त्व चौघांकडे सोपवणाऱ्या भाजपाने स्टार प्रचारकांच्या यादीत १७ जणांना स्थान दिले आहे. एकूण २१ नेत्यांवर भाजपाने विधानसभेसाठी मोठी जबाबदारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाड्यात बसला. विदर्भातील लोकसभेच्या १० पैकी केवळ २ जागा भाजपला जिंकता आल्या. फडणवीस, गडकरी, बावनकुळे विदर्भातून येतात. तिथे विधानसभेच्या ६२ जागा येतात. त्यामुळे भाजपाने विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. विदर्भासाठी मध्य प्रदेशमधील ४ नेत्यांना सक्रिय करण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"