टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू!

तळेगाव : तळेगाव- चाकण रस्त्यावर रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात आयशर टेम्पो चालवून एका दुचाकीस्वराला समोरून धडक दिली. यामध्ये एका व्यक्तीचा उपचारानंतर मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 31 मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली .

याप्रकरणी राहुल मनोहर पाटील (वय 33, रा झित्राईमळा , आंबेठाण रोड ,चाकण, ता. खेड, मूळ गाव- बलकुव ,ता. शिरपूर, जि. धुळे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अरविंद कुमार विजय बहादुर यादव (वय 50 ,रा. वसई, जि. पालघर )असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो क्रमांक (एम एच 48 डीसी /12 11) हा तळेगाव बाजूकडून चाकण बाजूकडे जात असताना रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून समोरून येणाऱ्या होंडा शाईन मोटरसायकल नंबर (एम एच 19 इ आर 4776) हिस व फिर्यादीचा चुलत मामा विजय तुळशीराम कापडे यास धडक देऊन जखमी केले. या अपघातात विजय तुळशीराम कापडे यांच्या डोक्यास, हातात, पायास गंभीर मार लागल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले असता ते उपचारापूर्वीच मयत झाले. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रेळेकर हे तपास करत आहेत.

