महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश!

नवी दिल्ली : देशाचे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे लवकरात निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे सुपुत्र आणि प्रसिद्ध विधी तज्ञ न्यायमूर्ती भूषण गवई यांची निवड होणार आहे .आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले आणि सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ न्यायमूर्ती भूषण गवळी हे देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. 14 मे रोजी सरन्यायाधीश पदाची ते शपथ घेणार आहेत राष्ट्रपती द्रोपदी मुरमु या गवई यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील अशी अशी माहिती आहे.
न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला आहे. मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये वकिली व्यवसाय केला .यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत राजा भोसले त्यांच्यासोबत काम केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ते न्यायाधीश झाले काही वर्षांनी त्यांना बढती मिळाली.

गवई यांनी नागपूर बार असोसिएशनचे सदस्य म्हणून काम पाहिले. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद बोबडे सरन्यायाधीश झाले आहेत. 2019 मध्ये भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयासाठी शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर न्यायाधीश म्हणून त्यांनी 24 मे 2019 रोजी शपथ घेतली. त्यांच्या सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ 14 मे 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत असून त्यांना सहा महिन्याचा कालावधी मिळणार आहे. भूषण गवई है भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते माजी आमदार, माजी खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्याचे राज्यपाल राहिलेल्या रा .सू गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत