‘विकसित महाराष्ट्र’ भविष्यात आदर्शवादी ठरेल

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी व्यक्त केले मत
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ या अभियानाच्या माध्यमातून युवकांना घातलेली साद सार्थकी ठरली. हे अभियान तरुणाईला विशेष भावले. उद्याचा महाराष्ट्र खरोखरच विकसित महाराष्ट्र व्हावा या विचाराने भारावलेल्या बहुसंख्य तरुणाईने आपला मतरुपी आशीर्वाद महायुतीच्या पारड्यात टाकला. त्यामुळे हा विजय आणखीनच सुकर झाला, अशी भावना भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी व्यक्त केली आहे.
नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळविले. राज्यात महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात विकासाच्या वाटेवर अग्रेसर असणाऱ्या या सर्व तरुणाईचे आभार मानावे तेवढे थोडकेच आहेत, असे मत भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ” भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तसेच विधानपरिषद आमदार व भाजयुमो प्रभारी विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ या अभियानाच्या प्रचारार्थ संवाद दौऱ्याचे महिनाभर आयोजन करण्यात आले होते. विकसित महाराष्ट्रासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब आणि राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब हे कसे अग्रेसर आहेत. याबाबत युवकांना आश्वस्त करण्यात आले. विविध योजनांच्या ‘ब्ल्यू प्रिंट’च युवकांसमोर सादरीकरण करण्यात आलं होत. भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी त्यासाठी महिनाभर राज्यातील तब्बल १९ जिल्हयात ६९०० किमीचा प्रवास केला.
प्रवासा दरम्यान बाईक रॅली आणि बैठकांद्वारे युवकांमध्ये जनजागृती करण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत सुझावपत्र एकत्रित करीत मोठ्या संख्येने युवकांना या अभियानाशी प्रत्यक्षपणे जोडण्यात आले आहे. या दरम्यान सामाजिक व राजकीय स्तरावर कार्य करणाऱ्या अनेक युवक-युवतींशी संवाद साधण्यात आला. ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ या अभियानाचा उद्देश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला.७६१७६१२०२४ या क्रमांकास मिस कॉल देऊन , क़्यु आर कोड, वेब साईट च्या माध्यमातून “विकसित महाराष्ट्र सदस्यता” अभियानात मोठ्या संख्येने युवक आणि युवतींना सामावून घेत त्यांचे विकसित महाराष्ट्र कसे असू शकते? याबाबत मते, संकल्पना आणि सूचना यात नोंदविण्यात आल्या, तसेच विकसित महाराष्ट्र Valenteer ची नोंदणी करण्यात आली. या पत्रकात प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जेष्ठ नेते गिरीश महाजन यांची युवा मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली. उपक्रमाबाबत त्यांच्यासोबत आढाव बैठक संपन्न झाली. त्यांनी पुढील कार्यासाठी सज्ज होण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, निखिल चव्हाण, योगेश मैद, प्रदेश उपाध्यक्ष अरुण पाठक तसेच युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.