किरीट सोमय्या पक्षावर नाराज?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना पक्षाकडून विधानसभेच्या संपर्क प्रमुख पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. परंतु, सोमय्या यांनी हे पद नाकारलं आहे. त्यामुळे आता माजी खासदार किरीट सोमय्या हे पक्षावर नाराज असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अद्याप तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच विविध पक्षांमधील नाराजी उघड होऊ लागली आहे. भाजपामध्येही सध्या अशाच काही घडामोडी सुरू आहेत. एका सोशल मिडियाच्या माध्यमातून सोमय्या यांनी भाजपाच्या नेतृत्त्वाला हा नकार कळविला आहे. भाजपाचे निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही एका पत्राद्वारे त्यांनी हा निर्णय कळविला आहे. साडेपाच वर्ष कोणतेही पद न घेता मी सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काम करत आहे, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.