दिवाळीत सायबर टोळ्यांपासून सावधान; खबरदारीचे पोलिसांचे आवाहन!

पिंपरी : दिवाळीनिमित्त विविध सवलतींचा वर्षाव समाज माध्यमांवर सुरू असून या आनंदोत्सवावर गालबोट लावण्यासाठी सायबर चोरटे सरसावले आहेत असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी केले आहे . सायबर गुन्हे केवळ तांत्रिक समस्या नाही एक सामाजिक जबाबदारीचा प्रश्न आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असून जागरूकता हेच सर्वात मजबूत कवच आहे असे पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांनी स्पष्ट केले आहे .

अनेक कंपन्यांच्या नावे बनावट संकेतस्थळ तयार करून त्या संकेतस्थळावर आकर्षक ऑफर आणि मोठ्या सवलती दाखवून नागरिकांकडून पैसे घेतले जातात. मात्र ऑर्डर केल्यानंतर वस्तू मिळत नाही किंवा निकृष्ट दर्जाचा बनावट वस्तू पाठवल्या जातात. नागरिकांच्या मोबाईलवर दिवाळी बोनस गिफ्ट हॅम्पर मिळवा किंवा 5000 कॅशबॅक जिंका असे संदेश येतात .त्यात दिलेल्या लिंक वर क्लिक होतात .मोबाईल बँकिंग ची माहिती गुन्हेगारांच्या हाती लागते .गिफ्ट लिंक ,बंपर ऑफर आणि कॅशबॅक च्या अंशाने ही फसवणूक केली जाते .त्यामुळे ऐन दिवाळीत सायबर चोरट्यांनी विविध पद्धतीने नागरिकांना फसवण्याची शक्यता आहे. सतरा वेगवेगळ्या पद्धतीने असे गुन्हे घडल्याचे समोर आले आहे.
ऑनलाइन खरेदी गिफ्ट ऑफर आणि केवायसी अद्यावत करण्याच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना घडल्या जातात .ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या सणासुदीच्या काळात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे .यासाठी दिवाळीच्या काळात ऑनलाइन फसवणुकी पासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी तिचा स्त्रोत पहावा. सायबर गुन्हे केवळ तांत्रिक समस्या नाही एक सामाजिक जबाबदारीचा प्रश्न आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असून जागरूकता हेच सर्वात मजबूत कवच आहे

