भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यावर पिंपरीत बेटिंग!

पिंपरी:भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या सामन्याची मोबाईल ॲप वरून बेटींग पिंपरी पोलिसांनी रंगेहात पकडले.तीन व्यक्तीविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोसिन रमजान शेख पोलीस शिपाई पिंपरी यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा डिसेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मॅच सुरू असताना भावेश लखवाणी ( रा विजय अपार्टमेंट.फ्लॅट नंबर 101.धनराज सोसायटी समोर पिंपरी),पांडे , किरण वय 40,पिंपरी(दोघांचे नाव पत्ता माहीत नाही)बाळ गोपाळ शाळेसमोर,वाघेरे पार्क सोसायटी पिंपरी येथील सार्वजनिक रस्त्यावर मोबाईल ॲप द्वारे आरोपी सामन्यावर बॅटिंग घेत होते. आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12,इंडियन टेलिग्राम ऍक्ट कलम 25 क प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी झेड फोल्ड-सहा,मोबाईल हँडसेटसह आरोपी क्रमांक एक मिळून आला.पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे हे पुढील तपास करीत आहेत
ट्रॅक्टरची जोरदार धडक ; दुचाकीस्वार जखमी
कासारवाडी येथे भरधाव ट्रॅक्टरने एका दुचाकी वाहनचालकाला पाठीमागून धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे .याबाबत दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेखा विठ्ठल नेलवाडे (वय 28, रा ऐश्वर्या हमारा म्हाडा, प्लॉट नंबर डी 608 ,देहू आळंदी रोड चिखली )यांनी फिर्यादी दिली आहे .
22 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजून 35 मिनिटांनी हा अपघात झाला. कासारवाडी मेट्रो स्टेशनच्या पुढे मुंबई पुणे महामार्गावर हा अपघात झाला. विठ्ठल रतनराव नेलवाडे हे दुचाकी वाहनाने चिखली ते कोंढवा असा कामानिमित्त प्रवास करत होते. चिखली वरून कोंढव्याला जाताना कासारवाडी येथे ट्रॅक्टर नंबर .एम .एच 14 ,एच के ,64 65 भरधाव वेगाने जात असताना विठ्ठल नेलवाडे यांच्या (दुचाकी क्रमांक एम .एच 14 जेडब्ल्यू 51 44 )या दुचाकी ला धडक देऊन जखमी केले. नेलवाडे यांचा उजवा पाय ,मनका, छाती फॅक्चर झाल्याचे तसेच किडनीस व लिव्हरला गंभीर दुखापत झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .
याप्रकरणी ट्रॅक्टर चालक संजय गोपाळ गायकवाड (वय 25 ,रा. वडमुखवाडी ,भोसरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

