बालाजी सेंट्रींग कंट्रक्शन कंपनीची 44 लाख 78 हजार रुपयाची फसवणूक!

पिंपरी : बालाजी सेंट्रींग कंट्रक्शन कंपनीकडून कन्ट्रक्शन साहित्य दरमहा भाड्याने घेऊन गेल्या नऊ महिन्यापासून भाडे पूर्णपणे थकवून कन्ट्रक्शन साहित्य देखील परत न करता 44 लाख 78 हजार रुपयाची फसवणूक केली. ही घटना 20 मार्च 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीत सर्वे नंबर 73/7, वैष्णवी प्राईड, गुलमोहर कॉलनी, पिंपळे गुरव येथे घडली.

या प्रकरणी अरुण श्रीपती पवार (वय 47, वैष्णवी प्राईड, गुलमोहर कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गिरीश धनराज भट्टेवार (वय 47, रा. आशीर्वाद अपार्टमेंट , काशीद पार्क ,फ्लॅट नंबर 11, पिंपळे गुरव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने बालाजी सेंट्रींग कंट्रक्शन कंपनीकडून कन्ट्रक्शन साहित्य 2651 प्लेट्स व तेराशे पाच प्राॅक्स दरमहा भाड्याने घेऊन गेल्या नऊ महिन्यापासून भाडे पूर्णपणे थकवून व इतर थकीत भाडे थकविले. फिर्यादी यांनी त्यांचे बांधकाम साहित्य परत मागितले असता ते परत न करता फिर्यादी यांची 44 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक केली आहे .सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे पुढील तपास करत आहेत.

