शेअर ट्रेडिंगद्वारे फायदा देण्याचे आमीष ; 97 लाख 70 हजार रुपयांची फसवणुक!

पिंपरी : शेअर ट्रेडिंग केल्यास दहा ते पंधरा टक्के पेक्षा जास्त फायदा देण्याचे आमीष दाखवून 97 लाख 70 हजार रुपयांची एका व्यक्तीची फसवणुक केली. ही घटना 13 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते 14 नोव्हेंबर 2025 सकाळी दहा वाजता दरम्यान घडली.

याप्रकरणी सुनील श्रीपती झेंडे (वय 56, रा. 121, थेरगाव )यांनी सायबर शाखेकडे फिर्याद दिली आहे. अद्विका शर्मा व राकेश जैन व विविध बँकांचे अकाउंट धारक यांच्या नावे गुंतवणूक करण्यास आरोपींनी फिर्यादीस भाग पाडले .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन यांनी त्यांचे व्हाट्सअप वरून फिर्यादी यांना एक्स -102 रिलायन्स कॅपिटल ग्रोथ अलायन्स व एक्स -102 रिलायन्स सिक्युरिटी कस्टमर सर्विस सेंटर या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून त्यांचे सांगण्यावरून शेअर ट्रेडिंग मध्ये दहा ते पंधरा टक्के पेक्षा जास्त फायदा देण्याचे आमीष दाखवले.
फिर्यादीस रारशी एप्लीकेशन डाऊन करण्यास भाग पाडले .तसेच सदर ॲप्लिकेशन मध्ये वेगवेगळ्या शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली वेगवेगळ्या बँकांमध्ये फिर्यादी यांना पैसे भरण्यास भाग पाडले. रारशी एप्लीकेशन वर खोटा नफा दाखवला व तो काढण्यासाठी आयपीओ अलर्ट झाल्याचे सांगून तो खरेदी करण्यास सांगितले .फिर्यादी यांची गुंतवणूक रक्कम व नफा परत न करता फिर्यादी यांची 97 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे.

