आयुष कोमकर खून प्रकरणी ; बंडू आंदेकर यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने नानापेठेत भर दिवसा गोळीबार करून गणेश कोमकर यांचा मुलगा गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर याचा खून केल्याचा आरोप करत बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याप्रकरणी कल्याणी गणेश कोमकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत नमूद केल्यानुसार खुनाचा कट बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर ,पुतण्या शिव आंदेकर,नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर , अभिषेक आंदेकर ,शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर , लक्ष्मी आंदेकर , अमन युसुफ पठाण उर्फ खान , यश सिद्धेश्वर पाटील यांनी रचला असल्याचे नमूद केले आहे .
पोलिसांच्या माहितीनुसार शुक्रवार पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आयुष दुचाकीवरून घरी परतला . तो तळमजल्यावर दुचाकी लावत असताना आरोपी अमन खान व एस पाटील हे आधीपासूनच सोसायटीच्या आवारात दबा धरून बसले होते. त्यांनी आयुषवर पिस्तुलातून बेझूट गोळीबार करून जागीच ठार मारले . या गोळीबारामागे आंदेकर टोळीने रचलेला बदला असल्याचे म्हटले आहे .
मागील वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळीबार व कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी गणेश कोमकर व त्याचे नातेवाईक यांच्यासह 16 जणांना अटक करण्यात आली होती . या घटनेनंतर आंदेकर टोळी व कोमकर गट यांच्यात वैर निर्माण झाले आहे. त्यातच हा थरारक बदला घेण्याचा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे . समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे . आंदेकर आणि कोमकर या टोळीच्या अंतर्गत हत्याकांडामुळे नाना पेठ परिसरात अशांततेचे वातावरण असून पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला आहे.