आयुष कोमकर यांच्यावर चार दिवसानंतर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार!

पुणे : टोळी युद्धातील बळी ठरलेल्या आयुष कोमकर याच्यावर सोमवारी चार दिवसानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .आयुष-वडील गणेश आणि कल्याणी कुमकर हे वनराज आंदेकर च्या हत्या प्रकरणा तील आरोपी असून ते नागपूर कारागृहात बंदिस्त आहेत. त्यांना मुलाच्या अंत्यविधीसाठी पुण्यात आणले आहे आंदेकर आणि कोमकर यांच्या वादातून आयुष कोमकर याचा शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून खून झाला.

गोळ्या झाडणार्या मारेकऱ्यांना पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. यश पाटील आणि अमित पाटोळे अशी त्यांची नावे आहेत यश पाटील ने आयुष कोमकर वर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. तर अमित पाटोळे दुचाकी चालू करून थांबला होता .राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा एक सप्टेंबर 2024 रोजी गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुषचा खून करण्यात आला. बंडू आंदेकर यांच्यासह 13 जणांवर आयुष कोमकर हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .मात्र बंडू आंदेकर आणि त्याचे साथीदार फरार झाले असून त्यांचा तपास पोलीस करीत आहेत.
यश पाटील आणि अमित पाटोळे यांना आज दाखल करण्या आले. न्यायालयाने त्यांना 12 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.