फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न; चाकणमधील घटना!

विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न; चाकणमधील घटना!

पिंपरी : बांधकामाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (२१ जानेवारी) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील वडगाव घेनंद येथे घडली.

viara vcc
viara vcc

सचिन काळुराम यादव (वय ३३, वडगाव घेनंद, खेड, पुणे) यांनी चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नागेश थोरवे (चर्होली, खेड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या शेतात शंभू मौर्य हे कंपाउंड घालण्याचे काम करत असताना आरोपी तिथे चारचाकी गाडीतून आला. ‘कोणाला विचारून कंपाउंड करत आहेस’ असे म्हणून त्याने वाद सुरू केला. फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना धक्का दिला आणि लाकडी काठीने शंभूच्या जबड्यावर जोरात फटका मारला. त्यानंतर ‘थांब तुला ठार मारतो’ अशी धमकी देत शंभूला जवळच असलेल्या विहिरीत ढकलून दिले. नातेवाईकांनी वेळीच धाव घेतल्याने शंभूला विहिरीबाहेर काढण्यात आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. चाकण दक्षिण पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"