फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
विधानसभा २०२४

वडगावशेरीमधील शरद पवार गटाचे नेते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला!

वडगावशेरीमधील शरद पवार गटाचे नेते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला!

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या असून उद्या मतदान होणार आहे. तर या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ चर्चेत राहिला. धानोरीच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. धानोरीत अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.

रेखा टिंगरे यांनी नुकताच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या पतीच्या गाडीवर वीट फेकल्याचा आरोप ड्रायव्हरने केला आहे. विश्रांतवाडी परिसरातील धानोरी जकातनाका परिसरात हा प्रकार घडला आहे. या मतदारसंघातून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे, तर शरद पवार गटाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचे सर्वांनी पाहिले. मागील सहा दिवसांपूर्वी वडगावशेरी भागातील अजित पवार गटाचे नेते चंद्रकांत टिंगरे आणि माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत टिंगरे आणि रेखा टिंगरे यांनी शरद पवार गटात प्रवेश देखील केला. यामुळे एकूणच महायुतीला धक्का मानला जात आहे.

चंद्रकांत टिंगरे यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती बापूसाहेब पठारे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळताच चंद्रकांत टिंगरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात केली. या हल्लेखोरांचा पोलीस तपास करीत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"