फक्त मुद्द्याचं!

6th September 2025
मुंबई

लालबागच्या चरणी साडेतीन किलो सोनं!

लालबागच्या चरणी साडेतीन किलो सोनं!

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला मुंबईचा लालबागचा राजा हा मुंबईतला प्रसिद्ध गणपती आहे. दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी भरभरुन दान दिलं जातं. यंदाही साडेतीन किलो सोनं, ६४ किलो चांदी आणि पाच कोटी १६ लाख रुपये रोख रकमेचं दानन करण्यात आलं आहे.

लालबागच्या राजाच्या चरणी भक्त दरवर्षी भरभरुन दान करतात. या दानाची मोजणी मंडळाकडून करण्यात येत असते. लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोने आणि चांदीचा लिलाव केला जातो. त्यामधून जी रक्कम जमा होते, त्यामाध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.

गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी पाच कोटी सोळा लाख रुपये रोख रक्कमेचं दान आलं आहे. तर साडेतीन किलो सोनं आणि चौसष्ट किलो चांदी यावेळी लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीपासूनच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी रांगेत उभं राहण्यास सुरुवात केली होती. तर यंदाही रोख रक्कम, सोनं आणि चांदीचं भरभरुन दान करण्यात आलं आहे. पहिल्याच दिवशी भाविकांकडून केलेल्या दानामध्ये ४२ लाख रुपयांची रोख रक्कमेची नोंद करण्यात आली आहे. तर १९८.५५० ग्रॅम सोने आणि ५४४० ग्रॅम चांदीच्या वस्तू राजाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी ६०, ६२, ००० रोख रक्कमेच्या दानाची नोंद करण्यात आली आहे. तर राजाला दुसऱ्या दिवशी १८३.४८० ग्रॅम सोन्याचे दान भाविकांकडून करण्यात आलंय. तसेच ६,२२२ ग्रॅम चांदीच्या दानाची नोंद करण्यात आली.

अंबानींकडून २० कोटीचा मुकुट
पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास २० लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवूड कलाकार, राजकीय नेत्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. याच लालबागच्या राजाला अनंत अंबानी यांनी २० किलो सोन्याचा मुकूट भेट दिला होता. या मुकूटाची किंमत २० कोटी रुपये आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं त्याआधी राजाचा मुकूट काढून ठेवण्यात आला. हा सोन्याचा मुकूट आता लॉकरमध्ये ठेवण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"