फक्त मुद्द्याचं!

11th February 2026
पुणे

पुण्याला बुधवारी रेड अलर्ट

पुण्याला बुधवारी रेड अलर्ट

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : पुणे जिल्हा आणि परिसरात गेले तीन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परतीच्या पावसाचा जोर आता वाढत असल्याने हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला बुधवारी (दि. २६)रेड अलर्ट जारी केला आहे.

पुणे जिल्ह्यात बुधवारी २०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. तर कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर आणि वाशिम या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

सोलापूर आणि सांगली जिल्ह्याला कोणताही इशारा दिला नसून उर्वरित महाराष्ट्राला सतर्क राहण्याच्या सूचना (यलो अलर्ट) दिल्या आहेत. मंगळवारी रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. पुणे जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरणार आहे.

मंगळवारी दुपारी पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील विविध भागात दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. दरम्यान सकाळपासून काही ठिकाणी ढग दाटून आले होते. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातीरपिट उडाली. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ऊन अशी परिस्थिती शहरात पहायला मिळत आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"