पिस्टल व दोन जिवंत काडतुसे विनापरवाना जवळ बाळगल्याने अटक!

पिंपरी: शारीरिक इजा होईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगण्यास बंदी आदेश असताना एका व्यक्तीने 52 हजार रुपये किमतीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे विनापरवाना जवळ बाळगल्याने अटक करण्यात आली. ही घटना गुरुवार 9 एप्रिल रोजी सुमारे तीन वाजता लाईफ मोटेज सोसायटी, सुस कडे जाणाऱ्या रस्त्यावर ,सनी वर्ल्ड समोर सुस येथे घडली .

याबाबत रवी पवार पोलीस शिपाई, गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आदित्य लक्ष्मण शितोळे ( ऱा फ्लॅट नं.308, लाईफ मोटेज सोसायटी, शितोळे वस्ती , सुस , ता. णुळशी) असे आटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आदेशानुसार शारीरिक इजा होईल अशी कोणतीही शस्त्रे जवळ बाळगण्यास बंदी आदेश आहे. तरी देखील आरोपीने त्यांच्याजवळ 52 हजार रुपये किंमतीचे एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे विनापरवाना बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याचे आढळून आले. हे पिस्टल त्याचा मित्र आदेश उर्फ ऋषिकेश राम टेमकर याने ठेवण्यासाठी दिले असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. बावधन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मारणे हे तपास करत आहेत.

