आक्षेपार्ह पोस्टमुळे यवत मध्ये दोन गटात वाद; जमावाने जाळपोळ करुन गाड्या पेटविल्या!

पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधरांच्या नळकांड्या फोडल्या
दौंड : दौंड तालुक्यातील यवत मध्ये एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर शुक्रवार एक ऑगस्ट रोजी दुपारी बारानंतर दोन गट आमने- सामने आले जमावाने चार चाकी आणि दुचाकी गाड्या पेटवून दिल्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे . आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .यवत मध्ये वातावरण तणावपूर्ण असून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधरांच्या नळकांड्या फोडल्या .गावातील महिला आणि लहान मुलांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांच्या सभेनंतर ही आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी काही तरुण एकत्र येऊन रस्त्यावरून फिरू लागले
एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर हा तणाव निर्माण झाला. .या पोस्ट नंतर गावामध्ये तणाव असल्याने गावकऱ्यांनी बैठकही घेतल्या. मात्र या सगळ्यांची माहिती पोलिसांना कशी लागली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या तरुणाच्या घराची देखील जाळपोळ करण्यात आली .उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारनंतर तणावग्रस्त परिसरात भेट देऊन नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले .आज पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी देखील येथे भेट देऊन नागरिकांनी शांतता राखावी, कायद्याचे उल्लंघन करू नये आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आव्हान केले आहे.

